Monday , September 21 2026
Breaking News

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न

Spread the love

कोल्हापूर (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात शासकीय, खासगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठामध्ये ’सामूहिक राष्ट्रगीत गायन’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ

Spread the love  “कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *