Wednesday , March 4 2026
Breaking News

महाराष्ट्र

अबब! चंदगडमधील कुदनूरमध्ये देशातील सर्वात उंच आश्वारूढ शिवमूर्ती बसवणार!

  बेळगावात तयार होतेय महाराष्ट्राचे आराध्य दैवत तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील कुदनूर गावात प्रतिष्ठापना होणारी आश्वारूढ शिवमर्ती ही औरंगाबादप्रमाणे देशातील सर्वात उंच शिवमूर्ती पैकी एक असणार आहे. तब्बल २५ फूट उंच असणारी ही शिवमूर्ती बेळगाव शहरात घडवली जात आहे. यासाठी मूर्तिकारांची रात्रंदिवस धडपड चालू आहे. सीमाप्रश्नासाठी बेळगाव …

Read More »

कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर

  कोल्हापूर : कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस शिवसैनिक राबले. दोन्ही खासदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चिड देखील पाहायला मिळत आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर …

Read More »

उद्या म्हणतील बाळासाहेबांनाही आम्हीच पक्षात आणलं; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

  मुंबई : शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. त्या सर्व आरोपांचं संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना खंडन केलं आहे. ब्ल्यूसी हॉटेलमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. 2019 मध्ये भाजपनं शब्द पाळलेला नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, शिंदे …

Read More »

चहावाल्याच्या लेकीला रौप्य; कोल्हापूरच्या निकिता कमलाकरने देशाला पदक जिंकून दिले

  मुंबई : अपंग चहा विक्रेत्याची मुलगी असलेल्या निकिता कमलाकरने आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. पुण्याच्या हर्षदा गरुडने सोमवारी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या निकिताने मंगळवारी रुपेरी यश मिळवले. निकिता ताश्कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ५५ किलो गटात स्नॅचमध्ये ६८ किलो वजनच पेलू शकली. त्यामुळे तिला या …

Read More »

कोल्हापूरचं ठरलं, हसन मुश्रीफ-संजय मंडलिकांमध्ये रंगणार लोकसभेची कुस्ती?

  कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ज्या आमदारांच्या मदतीने प्रा. संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेचे मैदान सहजपणे मारले, त्याच मंडलिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या कुस्तीत खासदार धनंजय महाडिक हे प्रचाराचे भाजपचे प्रचार प्रमुख असणार हे विशेष. शिंदे …

Read More »

स्वत:च्या रक्ताने प्रतिज्ञापत्र लिहून कोल्हापूरच्या शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

  कोल्हापूर : शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर नेत्यांची कोलांटउड्या इकडून तिकडे सुरु असल्या, तरी निष्ठावंत शिवसैनिक मात्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे. सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे. मातोश्रीवरील शब्द शिरसावंद्य मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा शिवसैनिक शिवसेनेत चाललेल्या घडामोडीत चांगलाच भेदरून गेला …

Read More »

कोल्हापूरमधील बंडखोर खासदारांच्या विरोधात शिवसेना आक्रमक

  कोल्हापूर : : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी या दोन्ही खासदारांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. खासदार संजय मंडलिक …

Read More »

’तेव्हा तुमचंच राष्ट्रवादीशी साटलोटं होतं’; रामदास कदमांना शिवसेनेचं सडेतोड प्रत्युत्तर

  नवी दिल्ली : ज्या शिवसेनेसाठी आयुष्याची 52 वर्षे मेहनत केली, त्याच शिवसेनेतून माझी हकालपट्टी झाली, असे म्हणत ढसाढसा रडणार्‍या रामदास कदम यांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रामदास कदम आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळीकीवर बोट ठेवत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक हारल्यानंतर हेच रामदास कदम राष्ट्रवादी काँग्रेससोबत संधान साधू …

Read More »

खासदार धैर्यशील मानेंच्या घरासमोर तगडा बंदोबस्त बहाल!

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धैर्यशील माने असो किंवा संजय मंडलिक हे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. केवळ अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून …

Read More »

केंद्रात ‘ज्यु. शिंदे सरकारमध्ये’? पंतप्रधान मोदी देणार स्पेशल गिफ्ट

  नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीत शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी शिंदे समर्थक खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांनंतर शिवसेना खासदारांनी वेगळी वाट धरल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा मोठा धक्का बसण्याची …

Read More »