Monday , September 21 2026
Breaking News

स्वत:च्या रक्ताने प्रतिज्ञापत्र लिहून कोल्हापूरच्या शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

Spread the love

 

कोल्हापूर : शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर नेत्यांची कोलांटउड्या इकडून तिकडे सुरु असल्या, तरी निष्ठावंत शिवसैनिक मात्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे. सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे.

मातोश्रीवरील शब्द शिरसावंद्य मानून जीवाची सुद्धा काळजी न करणारा शिवसैनिक शिवसेनेत चाललेल्या घडामोडीत चांगलाच भेदरून गेला आहे. गेलेल्या अनेक सत्तापिपासू नेत्यांवर ते संतापही व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नेते गोळा करण्यासाठी जाळे फेकले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांशी बैठकांचा धडाका लावला आहे. ते सातत्याने दिलासा देत आहेत.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकाने स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. स्वत:च्या रक्ताने लिहिलेलं पत्र त्या शिवसैनिकाने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना दिलं आहे. त्यामुळे या शिवसैनिकाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

About Belgaum Varta

Check Also

ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ

Spread the love  “कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *