कोल्हापूर : राज्यातील मुदत संपलेल्या ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे आदेश शुक्रवारी (दि. ८ जुलै) राज्य निवडणुका आयोगाने जाहीर केला. ज्या जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहे, त्या भागातील पालिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा देखिल समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड …
Read More »संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! अटक वॉरंट जारी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांनी, मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ज्यानंतर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात …
Read More »“धनुष्यबाण” शिवसेनेचा आहे अन् पुढेही राहील : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’वर बंडखोर गटाकडून दावा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त समोर आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. ‘धनुष्य बाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे …
Read More »वारकर्यांच्या आग्रहामुळे पंढरपूरला जाणार : उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले आणि महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, आपण पंढरपूरला जाणार आहोत, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. माध्यमांशी …
Read More »गाफील राहू नका, नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबई : शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …
Read More »काळजी करू नका… लवकर बरे व्हा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा
जखमींना तातडीची 25 हजार रूपयांची मदत सांगली (जि.मा.का.) : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार दि. 05 जुलै 2022 रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडीओ कॉलव्दारे संवाद साधून काळजी करू …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाची खाती भाजपकडे
मुंबई : राज्यात युतीचं सरकार स्थापन झाल्यावर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाची साथ मिळाल्यानंतर आता शिंदेसेनेला महत्त्वाची खाती मिळणार असा अंदाज बंडखोर आमदारांना होता. मात्र सत्तावाटपामध्ये भाजपचाच वरचष्मा राहण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. कारण महत्त्वाची मलईदार खाती भाजपामध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. …
Read More »कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी जबाबदारीतून मुक्त, नवीन तपास अधिकारी नेमण्याचा कोर्टाचा आदेश
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करणार्या अधिकार्याला जबाबदारीतून मुक्त करण्यासंबंधी मान्यता हायकोर्टाने दिली आहे. या संबंधी राज्य सरकारने एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. कोर्टाने ती याचिका स्वीकारली आहे. पण येत्या चार आठवड्यात नवीन तपास अधिकार्याची नेमणूक करावी असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती …
Read More »पन्हाळा तालुक्यातील कळे येथे बालविवाह रोखण्यास यश
कोल्हापूर (जिमाका) : कळे गावातील इयत्ता 12 मध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात बाल कल्याण समितीला यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्यांना 6 जुलै रोजी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील इ. 12 वीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बालविवाह …
Read More »‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा! : अधिवक्ता उमेश शर्मा
कोल्हापूर : ‘वंदे मातरम्’ला वर्ष 1909 या वर्षी मुस्लिम लीगने प्रथम विरोध केला आणि ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे 1947 ला भारताची फाळणी करून दुसर्या देशात म्हणजे पाकिस्तानात गेले. ‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta