माणगांव (नरेश पाटील): प्रभाग 17 मधील भागात सामाजिक भावना ठेवून माणगांव विकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते तसेच नगरपंचायतचे कर्मचारी संयुक्तरितीने स्वच्छता मोहिम राबविण्याकरिता पुढे सरसावल्याचे दिसून आले. सदर मोहीम शुक्रवार दि.11 मार्च रोजी सायंकाळी या भागातील एका स्मशानभूमीच्या आवारात पार करण्यात आला. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने सिराजभाई परदेशी, प्रवीण भागवे, बशीर खरेल, …
Read More »आदर्श महिला मंडळाचा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
माणगांव (नरेश पाटील) : आदर्श महिला मंडळ माणगांव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. आदर्श महिला मंडळामार्फत दि. ७ मार्च रोजी मंडळाच्या सभागृहात कार्यक्रम घेतला. सुरूवातीस स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सिंधूताई सपकाळ, माणगांवमधील व्हिक्टोरिया क्रॉस वीर घाडगे यांची पत्नी लक्ष्मीबाई,बकोरोनामुळे मृत्यू पावलेले ज्ञात-अज्ञात व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. लताजींच्या गीताने …
Read More »कोविड-19 मुळे पालक गमाविलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधीची तरतूद
कोल्हापूर (जिमाका) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीचा विनयोग कोविड-19 मुळे एक वा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली आहे. कोविड -19 संसर्गामुळे एक वा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शालेय …
Read More »डॉ. नरेंद्रसिंह यांचे रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड
माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चिटणीसपद भूषविणारे दक्षिण रायगड जिल्ह्यातील नामांकित व्यक्तिमत्व डॉ. नरेंद्र सिंह यांची दुसऱ्यांदा चिटणीसपदी नुकतीच निवड झाली आहे. डॉ. सिंह हे काँग्रेस पक्षातील जुने जाणते नेते आहेत तसेच त्यांनी दक्षिण रायगड येथे काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. …
Read More »बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याचे महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्यासाठी अधिकार प्रदान करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज निर्गमित केले आहेत. बैलगाडी शर्यत परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत व भविष्यात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. परिपूर्ण प्रस्तावासाठी अर्जदारास विहीत मुदतीत जिल्हाधिकारी …
Read More »चंदगड तालुक्यातील करंज गावचा जवान नितेश मुळीक आसाममध्ये शहिद
चंदगड तालुका हळहळला तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील करंजगावचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २५) हा आसाममध्ये सेवा बजावत असताना शहिद झाला. बुधवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडल्याचे कळते. ही दुःखद बातमी समजताच चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली. नितेश आठ वर्षापासून मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये …
Read More »चार राज्यातील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव
मोटरसायकल रॉली, फटाक्यांची आतषबाजी, साखर-पेढे वाटून केला विजयी जल्लोष कोल्हापूर : आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झाले. भाजपाच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. निकालाचा कौल स्पष्ट होताच दुपारी …
Read More »महिलांनी वेळेतच आपल्या आरोग्याचे निदान करावे : ना. सुभाष देसाई
माणगांव (नरेश पाटील) : माणगांव उपजिल्हा रुग्णालयात आणि नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून दि. 9 मार्च रोजी खास महिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिराचे उदघाटन उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, …
Read More »दिलीप उभारे ” रायगड भूषण”ने सन्मानित
माणगांव (नरेश पाटील) : रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित समाजाला जाणार “रायगड भूषण” पुरस्कार दिलीप सखाराम उभारे यांना देण्यात आला रविवार दि. 06 मार्च 2022 रोजी अलिबाग येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी दिलीप उभारे यांच्या धर्मपत्नी सौ. स्नेहल उभारे याही उपस्थित होत्या. यावेळी माणगांव येथील उभारे …
Read More »जागतिक महिला दिन विशेष : ग्रामीण महिला आणि महिला दिन…
जागतिक महिला दिन विशेष : ग्रामीण महिला आणि महिला दिन… आज ०८ मार्च अर्थात जागतिक महिला दिन. स्त्रियांवर होत असलेले अत्याचार, अन्याय दूर व्हावे, सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास व्हावा यासाठी आज जगभर महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा आराखडा पाहिला जातो. आपण काय केलय? कुठपर्यंत यश …
Read More »