Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही : दीपक केसरकर

गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२८) लाईव्ह संवाद साधताना शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विखारी टीकेवर बोट ठेवले. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे सांगून गुवाहाटीतील कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही, असा दावा केसरकर यांनी यावेळी केला. लवकरात …

Read More »

म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड! दोघांनी जेवणातून विष घालून मारले

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला माेठा निर्णय : मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

मुंबई : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ …

Read More »

शिंदे गटाला मोठा दिलासा : सुप्रीम कोर्टाकडून नरहरी झिरवळ, अजय चौधरी यांना नोटीस, पुढील सुनावणी ११ जुलैला

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे आणि १५ बंडखोर आमदारांविरोधातील अपात्रतेच्या नोटीसविरोधात बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, महाराष्ट्र विधानसभेचे सचिव, केंद्र आणि इतरांना नोटीस बजावली आहे. तसेच शिवसेना गटनेते अजय चौधरी, पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांना पाच दिवसांत …

Read More »

ठाकरे सरकार अल्‍पमतात : एकनाथ शिंदे गटाचा सर्वोच्‍च न्‍यायालयात दावा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील महाराष्‍ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्‍पममात आले आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांच्‍या गटाने दाखल केलेल्‍या याचिकेत म्‍हटलं आहे. तसेच ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून असून शिवसेनेच्‍या बंडखोर नेत्‍यांच्‍या जीवाला धोका आहे, असेही याचिकेत स्‍पष्‍ट करण्‍यात आले असून, यासाठी संजय राऊत …

Read More »

शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणारच, शिवसेनेला विश्वास; वकिलांनी मांडली कायदेशीर बाजू!

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या गटातील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू शकणार नाही आणि संबंधित आमदार अपात्र ठरू शकत नाही, असा दावा …

Read More »

बंडखोर आमदारांच्या घरांना आता केंद्राची सुरक्षा, सीआरपीएफचे जवान तैनात

मुंबई : बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून …

Read More »

फुटीरवाद्यांना माफी नाही, १५ ते १६ आमदार संपर्कात : आदित्य ठाकरे

मुंबई : फुटीरतावादी लोक शिवसेनेत नकोत. त्यांना आता माफ करणार नाही. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे स्‍पषट करत बंडखोर एकनाथ शिंदे गटातील १५ ते १६ आमदार संपर्कात आहेत, असा दावा युवासेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (दि.२६) येथे केला. ते सांताक्रुझ येथील युवासेनेच्या मेळाव्यात बोलत होते. …

Read More »

दूरदृष्टीचा प्रजावत्सल राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 मे 2022 या कालावधीत साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचा …

Read More »

‘शाहू छत्रपती’ चित्रपटाच्या माध्यमातून शाहू विचार सर्वदूर पोहचतील : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार भावी पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य आणि …

Read More »