Monday , September 21 2026
Breaking News

ठाकरे सरकार अल्‍पमतात : एकनाथ शिंदे गटाचा सर्वोच्‍च न्‍यायालयात दावा

Spread the love

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील महाराष्‍ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्‍पममात आले आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांच्‍या गटाने दाखल केलेल्‍या याचिकेत म्‍हटलं आहे. तसेच ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून असून शिवसेनेच्‍या बंडखोर नेत्‍यांच्‍या जीवाला धोका आहे, असेही याचिकेत स्‍पष्‍ट करण्‍यात आले असून, यासाठी संजय राऊत यांच्‍या विधानाच्‍या एका व्‍हिडीओची लिंकही सादर करण्‍यात आली आहे.

बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि प्रतोद भरत गोगावले यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्‍या खंडपीठासमोर ऑनलाईन सुनावणी होणार आहेत. ठाकरे गटाच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ विधीज्ञ कपिल सिब्‍बल, अभिषेक मनू सिंघवी, राजीव धवन, देवदत्त कामत यांनी तर एकनाथ शिंदे गटाच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ विधीज्ञ हरीश साळवे, महेश जेठमलानी, मुकुल रोहतगी, मनिंदर सिंह यांनी युक्‍तीवाद करणार आहेत.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर 16 आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी नोटीस बजावली होती. त्‍यांना आज (दि. २७) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कारवाईविरोधात बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि प्रतोद भरत गोगावले यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बंडखोर आमदारांविरोधातील नोटीस आणि शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्‍ती या निर्णयाविरोधात सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *