Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑफर धुडकावल्या..

  मुंबई : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्रि‍पदाची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच हवे आहे. त्याशिवाय शिवसेनेकडूनही मागणी करण्यात आली. पण भाजप मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन ऑफर दिल्या होत्या. या दोन्ही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदाऐवजी शिंदेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद …

Read More »

नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन

  नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. यासंदर्भातील बातम्याही अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या. मात्र प्रदेश काँग्रेसकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला असून नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसल्याचं सांगत पक्षाकडून यासंदर्भातील वृत्ताचं खंडन करण्यात …

Read More »

मुख्यमंत्रीपदासाठी दोन फॉर्म्युल्यांचा विचार!

  मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रि‍पदी कोणाची निवड होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युले समोर आले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच – अडीच वर्षाचा फॉर्म्युला मुख्यमंत्रिपदाच्या 2 …

Read More »

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना महाराष्ट्रात “काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार”

  पणजी : रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली महाराष्ट्र ‘सप्ताह फुलांचा’ या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल तसेच रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन …

Read More »

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर?

  एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीनं 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनं 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर महायुतीकडे 236 जागांचं संख्याबळ …

Read More »

चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचे औक्षण करताना उडाला आगीचा भडका

  कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. या विजयानंतर आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील …

Read More »

महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार

  सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता …

Read More »

26 नोव्हेंबरला महायुतीचे सरकार स्थापन होणार : उद्या नवीन आमदारांची बैठक

  मुंबई : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्तेच्या दिशेने एक पाऊल टाकताच कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने कळस गाठला. एकनाथ शिंदे यांच्या तसेच भाजप कार्यालयाजवळ जमलेल्या चाहत्यांनी महायुतीने प्रचंड बहुमत मिळताच विजयाच्या घोषणा दिल्या. उद्या नव्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत अंतिम …

Read More »

हसुर सासगिरीच्या शांताबाई जटा मुक्त होऊन मतदानाला

  गडहिंग्लज : गडहिंग्लज अनिसच्या कार्यकर्त्यांनी शांताबाईच्या मनातील भीती व अंधश्रद्धेची जळमटे दूर केल्यावर दहा वर्षे सोसलेल्या भल्या मोठ्या जटेचा भार उतरवला आणि 75 वर्षाच्या या आजीबाई अखेर जटामुक्त झाल्या. मांगनूर दड्डी येथील श्रीमती शांताबाई या हसुर सासगिरी येथे आपल्या सुमन शिवाजी मांगले या मुलीकडे सध्या राहायला आहेत. यापूर्वी या …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान

  करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. …

Read More »