Sunday , December 7 2025
Breaking News

महाराष्ट्र

भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

  कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर : हिंदुस्थानात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी, संविधानाचे रक्षण करणारी तर दुसरी विचारधारा शिवाजी महाराजांच्या विचारांचे संविधान संपवण्याच्या विचारांची आहे. विचारधारा अंमलात आणणार नसाल तर पुतळा उभारण्याला अर्थ नाही. शिवरायांचे विचार पाळले नाहीत म्हणून …

Read More »

राहुल गांधींचा टेम्पो चालकाच्या घरात पाहुणचार अन् दिलखुलास गप्पा

  कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले. परंतु या कार्यक्रमापेक्षा राहुल गांधींनी एका छोट्या कार्यकर्त्याच्या घरी दिलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सकाळी साडे आठ …

Read More »

जाहलो खरेच धन्य…! मराठी भाषेला अभिजात दर्जा

  केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय मुंबई : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत …

Read More »

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आचारसंहिता लावू नये; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

  छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांना डिस्टार्च मिळाला. नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यासाठी …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शिवाजीराव पाटील तुतारी हाती घेणार?

  चंदगड : गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापूर भाजपला मोठा धक्का दिला होता. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि चंदगडमधील भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले …

Read More »

माय मराठी ग्रुपतर्फे राघवेंद्र इनामदार यांना सन्मानपत्र

  राजगोळी : चंदगड तालुका मराठी अध्यापक संघामार्फत नुकताच राजगोळी हायस्कूलचे अध्यापक राघवेंद्र इनामदार यांना चंदगड तालुका मराठी प्रेरणा पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने माय मराठी ग्रुपतर्फे राघवेंद्र इनामदार यांना त्यांच्या घरी सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माय मराठीचे अध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले की “शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहे. इनामदार …

Read More »

चंदगडच्या पट्ट्याने खेचला १६०० कोटींचा निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

  आमदार राजेश पाटील याना पुन्हा संधी द्या दुप्पट निधी देतो तेऊरवाडी (एस के पाटील) : कर्नाटक व महाराष्ट्राच्या सिमेला लागून असणारा शेवटचा महाराष्ट्रातील मतदार संघ म्हणजे चंदगड. या मतदार संघात सहकार, शिक्षण आणि आरोग्य याचा सर्वांगिण विकास १६०० कोटी रुपये आणून आमदार राजेश पाटील यानी पहिल्याच टर्ममध्ये पूर्ण केला. …

Read More »

धावत्या एसटी बसमध्ये जावयाचा दोरीने गळा आवळून खून; सासू-सासऱ्याला अटक

  कोल्हापूर : दारू पिऊन मुलीला नेहमी मारहाण करणाऱ्या मद्यपी जावयाचा दोरीने गळा आवळून सासू-सासऱ्यानेच गडहिंग्लज – कोल्हापूर धावत्या एसटी बसमध्ये खून केला. मृतदेह कोल्हापुर एसटी स्टँडवर दुकानाच्या दारात ठेवून सासू-सासरे मध्यरात्री पुन्हा गडहिंग्लजला परतले. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून खूनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व शाहुपूरी पोलिसांनी लावला. सासरा …

Read More »

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार

  योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन कोल्हापूर (जिमाका) : राज्यात सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी दि. 28 सप्टेंबर …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

  कोल्हापूर (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज …

Read More »