Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

खा. धैर्यशील माने – राहुल आवाडे यांच्या ड्रॉयव्हरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

  इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील नाट्यगृह परिसरात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांची चारचाकी गाडी लावण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. यादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी इचलकरंजी दौर्‍यावर आले होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. नेमकं प्रकरण काय? यावेळी …

Read More »

उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना; आरोपीला अटक

  मुंबई : नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवल राहणाऱ्या यशश्रीचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, …

Read More »

पूर निवारणासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरूवात

  पुरपरिस्थिती बिकट झाली तरी घाबरून न जाता सर्व मिळून सामोरे जावू : पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आलेली अभूतपूर्व पुरपरिस्थिती लक्षात घेवून पुरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने व्हावे ह्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात देण्यात येणाऱ्या विविध मदतकार्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध संघटना, व्यावसायिकांसोबत नियोजन बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी …

Read More »

‘अलमट्टी’तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची …

Read More »

18 लाख वारकऱ्यांनी घेतले विठुरायाचे दर्शन; दानपेटीत कोट्यवधींचा निधी जमा

  मुंबई : यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 हजार बसेसव्दारे 19 हजार 186 फेऱ्यांमधून 09 लाख 53 हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला …

Read More »

सांगलीला पुराचा धोका, कोल्हापूर शहरात पाणी शिरले; एनडीआरएफची टीम तैनात

  सांगली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सततचा पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झाले असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा …

Read More »

ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी : मनोज जरांगे पाटील

  मुंबई : उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजाला मोठे करायचे असेल तर सर्वांनी एकत्र …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

  कोल्हापूर (जिमाका) :  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै …

Read More »

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवा; कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे विनंती

  कोल्हापूर : अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली भागाला महापुराचा पुन्हा मोठा धोका उद्भवू शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून कोल्हापूर आणि सांगली …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

    मुंबई : साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार …

Read More »