मुंबई : अशोक सराफ हे मराठी मातीतला अस्सल हिरा आहेत. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करणे ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना …
Read More »बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी …
Read More »मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका, प्रकृती अत्यवस्थ
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं आहे. सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन …
Read More »शरद पवार गटाला चिन्ह मिळालं; ‘तुतारीवाला माणूस’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं असून शरद पवार आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता चिन्हही बहाल केलं …
Read More »कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडीयाचा स्नेह मेळावा!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडीयाचा स्नेह मेळावा व कार्यकारिणी निवडीसंदर्भात कोल्हापूर सहकार बोर्ड येथील सभागृहात मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, डिजिटल मिडीया राज्य उपाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे व निमंत्रक अनिल धुपदाळे, विठ्ठल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी …
Read More »बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन पंढरी शेठ फडके यांचे निधन
पनवेल : महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक पंढरी शेठ फडके यांचे निधन वडिलांच्या काळापासून 1986 पासून बैलगाडा शर्यतीची आवड असलेले पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर …
Read More »‘लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप; काँग्रेसचे 7, तर शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवारांच्या संपर्कात’
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्याप्रमाणावर फुटतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ …
Read More »सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही : मनोज जरांगे
जालना : सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज मराठा समाजातील समनव्यक आणि आंदोलकांची बैठक बोलावली. त्यानंतर …
Read More »मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने विधानसभेत एकमताने संमत करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले. विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील तशी घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण …
Read More »सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार
सांगली : रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta