Wednesday , December 10 2025
Breaking News

महाराष्ट्र

कुरुंदवाडात ऊस आंदोलनाची ठिणगी; स्वाभिमानीने गुऱ्हाळाकडे निघालेला ट्रॅक्टर अडवला

  कुरुंदवाड : गत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दसऱ्यापूर्वी आणखी ४०० रुपये द्यावेत. या वर्षीच्या हंगामाचा ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. कुरुंदवाड येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यातील काडापूर (ता.चिकोडी) येथून शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील गुऱ्हाळ घराकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर अडवला. …

Read More »

चंदगड तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याच्या तयारीत

  चंदगड (प्रतिनिधी) :  चंदगड तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते. आज चंदगड तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची चंदगड येथे बैठक झाली. यामध्ये तालुक्यातील पदाधिकारी यांनी आपली मतं व्यक्त केली. यावेळी उपस्थित पदाधिकारी म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (गटातून) शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करून …

Read More »

अजित पवारांचा युक्तिवाद संपला, राष्ट्रवादीची पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला

  नवी दिल्ली : राष्ट्रवादी कुणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेली आजची सुनावणी संपली आहे. या पुढची सुनावणी ही 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. राष्ट्रवादीत आतापर्यंत लोकशाही मार्गाने काम होत नव्हतं, शरद पवार आपले घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. ज्या लोकांची शरद पवारांनी …

Read More »

दौलत (अथर्व)च्या महारोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद; मानसिंग खोराटे

  चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता अथर्वच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी दौलत कारखाना कार्यस्थळावर घेण्यात आला. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन चेअरमन मानसिंग खोराटे, सुनिल गुट्टे, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, मा.राज्य मंत्री भरमूआण्णा पाटील, ऍड. संतोष मळवीकर, शांतारामबापू पाटील, सचिन बलाळ, नामदेव पाटील …

Read More »

रविवारी कागलमध्ये दसरा महिला महोत्सव

  नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल शहरातील महिलांसाठी रविवार दि. ८ रोजी दसरा महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना अडीच लाखांची साडेसहाशे बक्षीस देण्यात येणार आहेत. …

Read More »

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू

  मुंबई : मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 58 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं …

Read More »

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा; कागल, गडहिंग्लज तालुक्यात मुसळधार

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात परतीचा पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, शिये परिसराला ढगफुटीसदृश पावसाने तडाखा दिला. कोल्हापूर शहर, गांधीनगर परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी शिये, कसबा बावडा परिसरात अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वत्र …

Read More »

पुण्याचे पालकमंत्रीपद अजित दादांकडे, तर सोलापूर, अमरावती चंद्रकांत पाटलांकडे

  राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर मुंबई : राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, …

Read More »

नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची संख्या 31 वर

  नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल रात्री चार मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. यासह, या रुग्णालयातील मृत्यूची संख्या ४८ तासांत ३१ वर पोहोचली आहे, अशी माहिती ‘एनडीटीव्ही’ने मंगळवारी दिली. मराठवाड्यातील प्रमुख शहर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही दुर्घटना घडली. एकूण मृतांमध्ये १६ नवजात …

Read More »

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

  छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय घाटी रुग्णालयाला कायम औषधटंचाईला तोंड द्यावे लागते. सोमवारीही येथे केवळ १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा होता. शिवाय हातात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन भटकणारे नातेवाईकही येथे पाहायला मिळाले. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »