बेंगळुरू : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.
दरम्यान सीईटी परीक्षा २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक विषयात ६० गुण असतील,” असे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
गणित व जीवशास्त्र परीक्षा पहिल्या दिवशी तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र चा पेपर दुसर्या दिवशी घेण्यात येणार आहे. १५ जूनपासून नोंदणी सुरू होईल. तसेच पीयूसी गुण विचारात घेतले जाणार नाहीत असेही ते म्हणाले. नारायण पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta