तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या आठवड्यात अलबादेवी (ता. चंदगड) या गावातील सुरेश कृष्णा घोळसे यांची बैलजोडी मरण पावली होती.
यामध्ये त्यांचे ७० ते८० हजाराचे नुकसान झाले होते. त्याचबरोबर शेतीच्या कामाला सुरुवात होते न होते तोच या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातच सुरेशच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामूळे पुढे काय? असा प्रश्न आ वाचुन पुढे होता.
या कूटुंबाला अलबादेवी ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे करत नवीन बैल जोडी घेवुन या कुटुंबाला आधार दिला. यासंदर्भातील सविस्तर वृत्त बेळगाव वार्तामध्ये प्रसिद्ध झाले होते.
सदरच्या अनपेक्षित मदतीने घोळसे कुटुंब भारावून गेले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू पाहून ग्रामस्थांना ही आंनद वाटला.
पुणे व मुंबई ग्रामस्थ मंडळ, स्थानिक ग्रामस्थ, न्यू हायस्कूल अलबादेवी शिक्षक वर्ग, आजी-माजी सैनिक यांनी आर्थिक पाठबळ देऊन बैलजोडी खरेदी करून दिली. या सर्वाबद्दल सुरेश घोळसे कुटुंबानी कृतज्ञता व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta