तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेली चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे रखडली होती. पुन्हा सत्तेत सहभागी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कामांची स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या
विकासकामांना वेग मिळाला असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली.
मागील सरकारची सात्ता असताना चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहतीतील ३२ कोटी ५० लाखांचे ट्रामा केअर सेंटरला मंजूरी मिळाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या हस्ते भूमिपूजनही झाले होते. तसेच १७ कोटी ३८ लाख खर्च अपेक्षित असलेली रस्त्यांची कामे असे एकूण सुमारे ५० कोटी रुपयांच्या विकास कामाना सरकार बदलल्याने स्थगिती दिली होती. पण आता पुन्हा राज्य सरकारने ही स्थगीती उठवल्याने ५० कोटींच्या विकासकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामध्ये विकास कामात वेंगुर्ला-आंबोली जिल्हा हद्दीपासून शिरगाव-नागनवाडी ते बेळगाव राज्य हद्द रस्त्यामध्ये क्रॅशबॅरियर बसवणे व रस्ता सुधारणा करणे ८० लाख, वेंगुर्ला- आंबोली रस्ता हद्दीपासून शिरगाव-नागनवाडी ते बेळगाव राज्य हद्द रस्तामध्ये सुधारणा करणे ९० लाख, कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्लज, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटनवाडी फाटा ते राज्य रस्ता मध्ये संरक्षक भिंत बांधणे व रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, जेऊर, शृंगारवाडी, हत्तीवडे, महागाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे ७ कोटी, रा. मा. १८० पासून तडशीनहाळ, तुर्केवाडी जंगमहट्टी ते प्रजिमा क्रमांक ७६ ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्रमांक ७९ मध्ये रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी ४२ लाख, प्रजिमा ६५ ते नागरदळे महिपाळगड रस्ता प्रजिमा क्र. ६८ मध्ये रस्त्याची सुधारणा करणे- ३८ लाख, रा. मा. १८० पासून कानूर, कुरणी गाव ते इब्राहिमपूर, अडकूरला मिळणारा रस्ता या कामांचा समावेश आहे.
ज्या विकास कामांच्या मुद्यावर अजित पवारना पाठींबा दिला आहे ती विकासकामे गतीशिल झाल्याने समाधानी असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.