शिनोळी (प्रतिनिधी) : ज्ञानदिप शिक्षण मंडळाचे राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे स्वातंत्र्यदिन शाळा व्यवस्थापन समिती सदस्या लक्ष्मी गणपती बामुचे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
डिजिटल क्लास रूम या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे, मनोरंजक व प्रभावी व्हावे म्हणून शिनोळी गावचे सुपुत्र व जवान गणपती बामुचे यांच्या पत्नी लक्ष्मी गणपती बामुचे यांनी शाळेला 43 इंची स्मार्ट टीव्ही भेटवस्तू शाळेचे मुख्याध्यापक नारायण तुकाराम भाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रताप सुर्यवंशी, सचिव बी. डी. तुडयेकर, ग्रामपंचायात सरपंच गणपत बामुचे, उपसरपंच पुंडलिक पाटील, माजी सरपंच नितिन पाटील, डॉ ऐश्वर्या पाटील व डॉ. भूषण पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या लक्ष्मी गणपती बामुचे, मुख्याध्यापक एन. टी. भाटे व रवी पाटील सर व ग्राम पंचायत सदस्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश गावडे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले तर आभार एस. जे. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta