चंदगड : चंदगड तालक्यातील पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण महाविद्यालयात जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर, केंद्रीय रेशीम बोर्ड व कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीच्या वतीने “कीटक संगोपन” चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकत्यांना उत्पादन वाढ कशी करावी व नवीन शेतकऱ्यांनी रेशीम लागवड करावी असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यात रेशीम उत्पादन वाढत आहे आणि नवीन शेतकरी सुद्धा यामध्ये उतरत आहेत. या सर्व नवीन शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, तसेच रेशीम कार्यालय नेहमीच शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ शरीफ बेग यांनी रेशीम किड्याचे संगोपन यावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.रेशीमपालन करतांना प्रथमतः तुती लागवड करावी लागते त्यासाठी गुणवत्तापूर्ण रोपांची लागवड करावी, वेळोवेळी शेडचे निर्जंतकीकरण करावे, उजी माशी साठी लागणारे ट्रॅप कसे वापरावेत, चॉकी कशी सांभाळावी तसेच इतर तांत्रिक मार्गदर्शन केले. महा एफपीसीचे समन्वयक अविनाश पाळवदे यांनी रेशीम उत्पादक कंपनी करण्याची गरज आणि कंपनीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा याविषयी मार्गदर्शन केले.
सोबतच कोल्हापूर रेशीम प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ बोकडे यांनी कंपनीच्या माध्यमातून सध्या पाटणे फाटा येथे सुरू करण्यात आलेल्या रेशीम साठी लागणाऱ्या वस्तूंच्या दुकांणा विषयी माहिती दिली तसेच कंपनीच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सुविधा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच भविष्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून चॉकी सेंटर सुरू करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना कमी दरात चॉकी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमात जिल्हा रेशीम कार्यालयाकडून ३ पुरस्काराचे वितरण करण्यात आले, यापैकी बसर्गे येथील प्रगतशील शेतकरी नामदेव पाटील यांना अंडीपुंज उत्पादनासाठी, मांडेदुर्ग येथील प्रगतशील शेतकरी विजय भोगण यांना चॉकी उत्पादनासाठी तसेच माळेवडी येथील महिला शेतकरी सविता शांताराम पाटील यांना मिळाला.
चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना रेशीम उत्पादक शेजाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाबार्ड कार्यालय कोल्हापूर, जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर व महा एफपीसी यांच्या माध्यमातून कोल्हापूर रेशीम उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे आणि आम्ही संचालक मंडळ शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करू असे कंपनीचे अध्यक्ष भावकु कलखांबकर यांनी केले. यावेळी कंपनीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाला जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे, केंद्रीय रेशीम बोर्डाचे शरीफ बेग, महा एफपीसीचे समन्वयक अविनाश पाळवदे, कोल्हापूर रेशीम उत्पादक कंपनीचे भावकू कलखांबकर तसेच चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.