
कोल्हापूर : न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन रजि. दिल्ली, मुख्यालय हुपरी जि. कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी प्रा. नागेंद्र जाधव यांच्या निवडीचे पत्र व ओळखपत्र देण्यात आले. यापूर्वी प्रा. जाधव हे न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव मारूती कल्याणकर, सदस्य शंकर पाटील, संजय भडांगे रा. आजरा, सौ. विद्या नागेंद्र जाधव आदी मंडळी उपस्थित होती. या फाऊंडेशनची उद्दिष्टे स्पष्ट करताना सरकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल, सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणे, कौटुंबिक वाद विवाद सोडवणे, रास्तभाव दुकानाबाबत प्रश्न, शेती, जमीन, घर याबाबत वाद सोडवणे, ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व पटवून देणे अशी उद्दिष्टे असल्याचे नामदेवराव जाधव यांनी स्पष्ट केले. त्यास अनुसरून लोकांनी आपल्या अडचणी, समस्या असल्यास तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta