
शिनोळी : चंदगड तालुक्यातील व बेळगाव सीमाभागातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र वैजनाथ देवालय देवरवाडी येथे दि. २१ पासून दवणा उत्सवाला प्रारंभ होत असून रविवारी दि. २१ रोजी मान प्रथेप्रमाणे कडोलीहून मानाची पालखी पळवत सायंकाळी वैजनाथ देवालयात आणली जाते. देवरवाडी गावातील जाधव घराण्याकडून सासनकाठी वाजत गाजत सर्व गावकरी वैजनाथ देवालयात आणतात. कडोलीहून आणलेल्या पालखीची विधिवत पूजा करून रात्री १२.३५ वा. श्री वैजनाथ व आरोग्य भवानी माता यांचा शिव –पार्वती रुपात विवाह सोहळा संपन्न होवून दवणा उत्सवाला प्रारंभ होतो. सोमवार दि. २२ रोजी भर दवणा यात्रा होणार असून मंगळवार दि. २३ रोजी भाविक भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सीमाभागातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याची नोंद घेवून देव दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta