Sunday , September 8 2024
Breaking News

कित्तूर तालुक्यातील एक ही मत भाजपला मिळणार नाही : आमदार बाबासाहेब पाटील

Spread the love

 

कित्तूर : कित्तूर तालुकावासीयांनी यावेळी एकही मत भाजपला न देण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसच्या योजनांचा लाभ लोकांना होत आहे. यंदा दुष्काळ पडला असतांनाही केवळ काँग्रेस सरकारच्या योजनांमुळे गरीबांच्या घरातली चूल पेटत आहे, त्यामुळे काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच मतदान करणार, असे जनतेचे म्हणणे असल्याची माहिती आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचाराचा झंझावात शुक्रवारी (ता.१९) कित्तूर तालुक्यातील कळभांवी आणि कादरवल्ली येथे पहावयास मिळाला. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कित्तूर तालुक्यातील अनेक गावात प्रचार रॅलीसह सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कित्तूरने आतापर्यंत भाजपला सहकार्य केले, पण भाजपने नेहमीच कित्तूर तालुकावासीयांची निराशा केली आहे. यापुढे भाजपला थारा नाही. सर्वसामान्यांना विविध योजनांमधून दिलासा देणारे काँग्रेस सरकारच कित्तूरचा कायापालट करू शकते, त्यासाठी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्य देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन आमदार बाबासाहेब पाटील यांनी कळभांवी येथील सभेत केले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरीकांनी हात उंचावून पाठिंबा जाहीर केला.

यावेळी बोलतांना डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, कित्तूर हा लढवय्यांचा तालुका आहे. या तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. हा विकास व्हायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. भाजपने या तालुक्यावर फक्त राज्य केले, विकासाकडे मात्र ढुंकूनही पाहिले नाही. केवळ खोटी अश्वासने द्यायची आणि मते मिळवायची, यापलिकडे भाजपने कांहीच केलेले नाही. त्यामुळेच यावेळी विधानसभा निवडणुकीत जनतेने बदल घडवून आणला. तोच बदल पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत घडवून आणायचा आहे, असे आवाहन केले.

कळभांवी आणि कादरवल्ली गावांतून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येणार तर काँग्रेसच, डॉ. निंबाळकरांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सभांना झालेल्या गर्दीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या गर्दीचे रुपांतर मतांत होऊ द्या, विकास आम्ही करतो, अशी घोषणा यावेळी आमदार पाटील यांनी केली. प्रचारादरम्यान ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *