बेळगाव : हुबळीच्या बी व्ही बी कॉलेजची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या झालेल्या निर्घृण खुनाचा बेळगाव जिजाऊ ब्रिगेड तीव्र शब्दात निषेध करत आहे.
सध्या समाजात विघातक कृत्याचे पेव फुटले आहे. माणसांचे सरळ साधं सामान्य निरामय जगणं मुश्किल झाले आहे. कुणी कसं जगावं? कुणाच्या जगण्याची रीत कशी असावी याच्यावर धार्मिक विघातक शक्तींचा प्रभाव पडू लागला आहे. राक्षसी वृत्तीने पछाडलेल्या दुसऱ्या धर्मातील मुलींची छेड काढणे, त्यांना वाईट प्रवृत्तीकडे नेणे, धर्म परिवर्तन करून त्यांचे विवाह करणे आणि त्यानंतर त्यांना नासवून टाकणे अश्या पद्धतीचे कार्य करू लागले आहेत. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज असून नेहा खून प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. याशिवाय या खून प्रकरणाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे यांचे हे द्योतक आहे. बेळगाव जिजाऊ ब्रिगेड नेहा हिरेमठ खून प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.