Monday , April 13 2026
Breaking News

शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा

Spread the love

 

चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत शिनोळी बु. येथे रामनवमी पारायण सोहळ्यानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पालक तसेच आजी-आजोबा यांचा विधीवत पाद्यपूजन सोहळा भावनिक आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची जपणूक यांचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आप्पाराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.
अर्चना गुरव यांनी काडसिद्धेश्वर कणेरी मठाची माहिती दिली . उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. “मुले हीच आपली खरी संपत्ती आणि आधार आहेत. बालवयात संस्कारक्षम पायाभरणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे सांगत पालक आणि विद्यार्थ्यांकडून संस्कार जपण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी कणेरी मठाचे शिक्षणमित्र, तालुका निरीक्षक यल्लाप्पा पाटील, शिवाजी चव्हाण, अजित कांबळे, अर्चना गुरव, अनिशा गुरव, सरोज अतिवाडकर, क्रांती नाईक, सरोजनी माडगुत, रसिका चिखले, मल्लूताई नाईक, वर्षा बसरगट्टी, तृप्ती तिप्पट, संजीवनी मनवाडकर,रेणुका मेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिशा गुरव यांनी खूप छान व भावनिक पद्धतीने प्रबोधन करत विधिवत पाद्यपूजन करवून घेतले. तसेच कुमार विद्या मंदिर व राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथील एन. टी. भाटे आणि शिक्षकवर्ग यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सीमाकवी व शिक्षक रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करत आईविषयक भावस्पर्शी काव्य सादर केले.

कार्यक्रमास ग्रामस्थ यशवंत डागेकर, प्रकाश गावडे, दयानंद रेडेकर, परशराम पाटील, नारायण बेळगावकर, भाऊ बोकमूरकर, पारायण मंडळ, एकनाथ राघोजी यांची उपस्थिती लाभली. गावडे सर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. हा पाद्यपूजन सोहळा विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदर, संस्कार आणि कृतज्ञतेची भावना दृढ करणारा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *