
दौलत हलकर्णी (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे गुढीपाडव्या निमित्त निट्टूर (ता. चंदगड) येथे गावामध्ये लाल मातीच्या कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे कुस्त्यांचे फड बंद होते. यावर्षी निट्टूर ग्रामस्थ तालीम मंडळाच्या वतीने गुडीपाडव्यानिमित्त शनिवार दि. २ रोजी श्री नरसिंह देवालयाजवळील भव्य मैदानात कुस्त्यांचे आयोजन केले आहे.
प्रथम क्रमांकासाठी सांगलीच्या भोसले व्यायाम शाळेतील पै.सुबोध पाटील विरुद्ध कर्नाटक केसरी विजेता पै.किरण दावनगिरी, रत्नकुमार आखाड्याचा पै.संगमेश बिराजदार विरुद्ध मोतीबाग तालमीचा पै.अरुण भोंगाळे तसेच महिला कुस्तीपटू कडोली जिल्हा बेळगाव येथील पै.स्वाती, राशिवडेची पै.पूजा, पै.मृणाली विरुद्ध कडोलीची पै. सानिका यांच्यात लढत होणार आहे.
यावेळी आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, भाजपा कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, काँग्रेस कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, महाराष्ट्र केसरी पै.विष्णू जोशीलकर, दौलत अथर्वचे मानसिंग खोराटे, ओलम (हेमरस) ऍग्रोचे भरत कुंडल, विक्रम चव्हाण – पाटील, जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कुस्तीप्रेमीनी या कुस्तीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे मंडळामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta