होसूरजवळ घडला अपघात
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देवदर्शन करून येणाऱ्या दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून या प्रकरणी चंदाप्पा शंकर लमाणी (वय 39, रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ – नांगनूर तांडा, ता. रामदुर्ग, जि. बेळगाव) यांनी चंदगड पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या अपघातात शारदा चंदाप्पा लमाणी (वय 36, सध्या रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ- नांगनूर तांडा, ता. रामदुर्ग जि. बेळगाव) या महिलेचा मृत्यू झाला असून ही घटना आज (शनिवार दि. 30 एप्रिल 2022 रोजी) दुपारी दोनच्या सुमारास बेळगाव – कोवाड रोडने अग्रेल करवालू यांचे शेताजवळ वळणावर होसूर गावच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रप्पा लमानी व त्याची पत्नी हे मोटर सायकलने (गाडी नं. MH04, DC 2057) वरून मन्नूर (ता. बेळगाव) येथून देव दर्शन घेवून बेळगाव रोडने कोवाडकडे येत असताना होसूर गावच्या हद्दीत समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटर सायकलीस जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेली शारदा चंदाप्पा लमाणी (वय 36) ही जागीच ठार झाली आहे. तर फिर्यादीला गंभीर दुखापत झाली असून ट्रक चालक अपघात पसार झाला आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याची प्रत मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो चंदगड याचेकडे देण्याची तजवीज ठेवली आहे. गुन्हाचा तपास पो.नि. घोळवे यांच्या आदेशाने पो.स.ई कांबळेहे करत आहेत.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …