Saturday , July 27 2024
Breaking News

माणगाव येयील महाविद्यालयीन युवकाचा लकिकट्टे तलावात बुडून मृत्यू

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : माणगाव ( ता. चंदगड ) येथील   महाविद्यालयीन युवक सुरज दत्तू चिंचणगी (वय २१ ) हा आपल्या मित्रासोबत लकिकट्टे तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला.
काल दि. २७ रोजी दुपारी आपल्या मित्रासोबत गावाजवळ असणाऱ्या लकिकट्टे गावच्या तलावामध्ये मित्रासोबत  पोहण्यासाठी गेला होता. पण पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने व दमछाक झाल्याने पाण्यात बुडू लागला. मित्रानी वाचवण्याचा प्रयत्न केला पण तेही पोहण्यामध्ये तरबेज नसतल्याने प्रयत्न व्यर्थ ठरले. यानंतर माणगाव ग्रामस्थांनी सुरजचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर चंदगडच्या रेस्कू टिमनेही सर्च ऑपरेशन राबवले पण त्यानाही यश मिळाले नाही. रात्र झाल्याने सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले. आज पुन्हा शोधमोहिम चालविण्यात आली. यामध्ये माणगांव येथील शिवाजी चिंचणगी व पांडूरंग चिंचणगी यानी अथक प्रयत्न करून सुरजचा मृतदेह सकाळी ११ वाजता पाण्यातून बाहेर काढला. यावेळी माणगाव पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटनास्थळी कोवाड पोलिस चौकिचे  पो. कॉ. कुशाल शिंदे, अमर सायेकर, हवालदार केसरकर यांनी भेट देवून पंचनामा केला. अधिक तपास पीएसआय चव्हाण करत आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुरजच्या पश्चात आई वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सुरज हलकर्णी महाविद्यालयात बीएसी भाग तीनमध्ये शिकत होता. त्याच्या आकस्मित निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढविण्यासंदर्भात महापूर नियंत्रण कृती समितीची सरकारकडे मागणी

Spread the love  सांगली : सांगली प्रशासनाने राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *