बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे नवी रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्नाटक प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाडी यांच्याहस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
भाजप बेळगाव ग्रामीण मंडळतर्फे बेळगावातील विजयनगरातील कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी नव्या ऍम्ब्युलन्स सेवेचा प्रारंभ करण्यात आला. रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह राघवेंद्र कागवाडी यांनी विधिवत या सेवेला चालना दिली.
याप्रसंगी क्रीडाभारतीचे कर्नाटक प्रांत कार्यवाह अशोक शिंत्रे, बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर, ग्रामीण मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, हिंडलगा ग्राम पंचायतीचे सदस्य रामचंद्र मन्नोळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
