ननदी : नणदी (ता.चिक्कोडी) येथील पूर्वी भाडेतत्त्वावर असलेल्या त्यावेळी नागरिकांच्या मागणीनुसार आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून महिला आरोग्य केंद्र इमारतीसाठी पंधरा लाख व शौचालय निर्मितीसाठी पाच लाख असा एकूण वीस लाखाचा निधी कामाची पूर्तता झाल्याची माहिती माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार यांनी दिली. ते नणदी येथे समस्त नागरिकांच्या उपस्थित नूतन इमारती उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी श्री लक्ष्मी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
हवालदार पुढे म्हणाले, आमदार गणेश हुक्केरी हे काही कारणास्तव बेंगरुळ कामासाठी गेले आहेत. त्यांनी समस्त गावकऱ्यांकडून उद्घाटन करण्यास मान दिला. तसेच हुक्केरी पिता-पुत्रांनी गावातील विविध विकास कामे करुन विकास गंगा राबविली आहे. त्यांचे शतशः ऋणी असल्याचे सांगितले. यावेळी पीडिओ कुमार डंग यांनी आरोग्य केंद्र कामाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी अध्यक्षा मंगल हवालदार, उपाध्यक्ष पद्मना पुजारी, अण्णा चिनगे, बंडा नाईकवाडी, संजय खिराई, अण्णाप्पा रळूकेदारी, विजय कोठरे, सदाशिव वंजीरे, अभिजीत सूर्यवंशी, कुमार पुजारी, चंद्रकांत कोकणे, मलिक नाईकवाडी, रामलिंग सुळे, कारदर्शी बि.डी. कांबळे, डॉ. योगेश कांबळे, अर्पिता जी., तस्लिम मुल्ला, इल्यास पटेल, गणेश सिद्धन्नावर, काशव्वा आंबीवाडी यांच्यासह, सदस्य, महिला, नागरिक व कर्मचारी आदी उपस्थित होते.