ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेत आज शुक्रवार दिनांक 18 रोजी रात्री आठ वाजता भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यात्रेचा मुख्य दिवस दिनांक 19 एप्रिल रोजी पहाटे भाविकांच्याकडून दंडवत सेवा होणार आहे व सकाळी 11 वाजता आंबील घागर मिरवणूक व त्यानंतर नाथांची विधिवत धार्मिक पूजन व महाप्रसादाने होणार आहे तर दिनांक 20 रोजी पहाटे कृष्णा डोने वाघापूरकर यांच्याकडून व सचिन पुजारी ननदी यांच्याकडून नाथांची भाकणूक होणार आहे व महानैवेद्याचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक 21 रोजी सायंकाळी नाथांची पालखी प्रदक्षणा भंडाऱ्याची उधळण व नारळ उडवण्याचा कार्यक्रम होणार असून यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यानच्या काळात ढोल वादन स्पर्धा, धनगरी ओव्यांचा कार्यक्रम तसेच घोडा गाडी बैलगाडी इत्यादी शर्यती व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान यात्रेमध्ये यात्रा कमिटी व ग्रामपंचायत ननदी यांच्याकडून पाणी व विद्युत पुरवठ्याची सुव्यवस्था ठेवण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta