
चिकोडी : खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली सहा वर्षीय चिमुकली दोन दिवसांपासून बेपत्ता असून नातेवाईकांसह पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. एका सीसीटिव्हीमध्ये ती गावातील कालव्याजवळ फिरत असल्याची आढळून आल्याने कालव्यात पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. निष्कषमी मडिवाळ (वय ६ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रायबाग तालुक्यातील निपनाळ येथील निष्कषमी मडिवाळ ही चिमुकली खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती, ती परतलीच नाही. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधत ती बेपत्ता असल्याची रायबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन दिवसांपासून नातेवाईकांसह पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. यादरम्यान पोलिसांनी गावातील सीसीटिव्ही तपासले असता ती एका सीसीटिव्हीत गावातील कालव्याजवळ खेळत असल्याची दिसून आली. त्यामुळे खेळता-खेळता तिचा कालव्यात पडून मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गावातील घटप्रभा उजव्या कालव्यात पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta