चिक्कोडी तालुक्याच्या मांजरी गावातील घटना
चिक्कोडी : नैवेद्य दाखवत असताना पाय घसरल्याने कृष्णा नदीत पडलेल्या एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात ही घटना घडली.
संगीता शिवाजी मांजेकर (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी नैवेद्य दाखवत असताना पाय घसरून ती नदीत पडली. दरम्यान या घटनेनंतर अग्निशमन दल, सडीआरएफ पथके आणि तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मृतदेहाचा शोध सुरू आहे. या घटनेची अंकली पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta