
सदलगा : येथील छ. शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ९.३० वाजल्यापासून कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि आणखी एका संघटनेच्याकडून तीन तास रास्तारोको करुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्यांदा घोषणाबाजी केली. रायबागकडून जवाहर साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या उसाचे ट्रॅक्टर आणि आणखीही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे जाणारे उसाचे सुमारे ३५ ते ४० ट्रॅक्टर आणि हलकी-अवजड वाहतूक आडविण्यात आली. या चालू २०२५-२६ ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन विनाकपात कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून ३५००/- आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून ३७५१/- दर जाहीर करावा आणि गाळप सुरू करावेत यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुरु असलेल्या को आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी आंदोलकांची भेट घेतली. कर्नाटक शासन, साखर आयुक्त आणि बेळगांव जिल्हा पालकमंत्री यांच्यापर्यंत आंदोलक शेतकऱ्यांची २०२५-२६ सालाची जी ऊस दर मागणी आहे त्याबद्दल निवेदन देण्याची ग्वाही दिली.
यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी जोपर्यंत कर्नाटकातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन विनाकपात ३५००/- दर देत नाहीत तोपर्यंत आपली ऊस कटाई बंद ठेवली जाईल अशी प्रतिज्ञा केली.
उपतहसिलदार पी. बी. शिरिवंत, महसूल निरिक्षक एम. ए. नागराळे, यांच्याकडे साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या निवेदनाची प्रत कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि आणखी एका संघटनेच्याकडून देण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभिजीत पाटील, विवेक नवले, नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, आनंद तारदाळे, संजू लठ्ठे, वैभव पाटील, संतोष नवले, सतिश पाटील, रवी गोसावी, उदयकुमार पाटील, चिदानंद मुतनाळे, अभयकुमार पाटील, बंटी पाटील (चांद शिरदवाड), अभय बदनीकाई, प्रविण संगुडगे, महावीर उदगांवे, रविंद्र दीक्षित, प्रविण संद्रे, माणिक चंदगडे, दादासाहेब वाघे, मयूर तवनक्के, संजय लट्टीमरडे, संजय कायकुल्ले, अनिल अनाजे, गुरुलिंग माने, अभिनंदन नांद्रे, संतोष हवालदार, पारीस सौंदत्ते, रमेश लंगोटे, चंद्रकांत कुप्पानट्टे, सुकुमार उगारे, मल्लाप्पा गौराजे, महावीर हुद्दार, श्रेणिक वडगांवे, प्रशांत साळुंखे, सुभाष गौराजे, मुबारक सनदी, श्रीशैल्य कमते, सुधीर मांगुरे, मधुकर परगौडर, संजीव कांबळे, अमित हणबर आणि शेकडो कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे आणि इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदलगा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Belgaum Varta Belgaum Varta