सदलगा : विश्वगुरु बसव संघ आणि अक्कमहादेवी बळगतर्फे गदगच्या शिवानंद बृहन्मठाचे मठाधिपती सदाशिवानंद महास्वामीजी यांचे श्रावणमासानिमित्त सदलगा येथील महादेव मंदिरामध्ये विशेष आशीर्वचनपर प्रवचन आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर चिक्कोडी सदलगा मतदार संघाचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी आणि येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामीजी उपस्थित होते.
गणेश हुक्केरी म्हणाले, महादेव मंदिराच्या समुदाय भवनाच्या निर्मितीसाठी तसेच सदलगा येथील केंद्रीय विद्यालय यासाठी आ. प्रकाश हुक्केरी यांचे योगदान मोलाचे आहे. यावेळी अन्नपूर्णेश्वरी फौंडेशनतर्फे अक्कमहादेवी बळगसाठी ५१ हजार रुपयांचा निधी दिला.
श्रद्धानंद स्वामीजी म्हणाले, संस्काराशिवाय शिक्षणाला महत्त्व नाही. शिक्षणासह सुसंस्करनेच मनुष्याला उन्नत्ती साधता येते.
सदाशिवानंद स्वामीजी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सूसंस्करच महत्वाचे आहेत. साधना महत्वाची. जगात भोजनापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून नंतरच भोजनग्रहण करणे हे संस्कार केवळ लिंगायतांच्यातच आहेत.
विश्वगुरु बसव संघाचे रक्तदानाचे शिबिर अत्यंत मोलाचे आहे. रक्तदान श्रेष्ठ दान आहे, गरजवंताला रक्त कुणाचे, कोणत्या धर्माच्या, कोणत्या जातीच्या व्यक्तीचे हे गौण असून त्या विशिष्ट वेळी उपचाराधीन व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी केवळ रक्तच महत्वाचे असते, तिथे जातपात, धर्मभेद अशा गोष्टींना थारा नसतो. सदाशिवानंद स्वामीजीनी विश्वगुरु बसव संघाचे कौतुक केले.
———————————
गदगमधील शिवानंद बृहन्मठाचे मूळ स्वामी शिवानंद महास्वामीजी यांचे जे तैलचित्र मठाधीशांच्या सांप्रदायिक गादीच्या जागी लावलेले आहे ते सदलग्यातील वि. आ. पोतदार यांनी १९६० साली काढलेले आहे तशी चित्रावर नोंदही आहे अशी माहिती सदाशिवानंद स्वामीजींनी यावेळी दिली. सदलग्यात या वि. आ. पोतदार यांना विठू पेंटर असे ओळखत होते. ते शास्त्रीय ख्याल गायकी होते. त्यांची गायने आकाशवाणीवरून प्रसारीत होत असत.