Sunday , December 7 2025
Breaking News

डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या सभासदांना पंधरा टक्के तर कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस

Spread the love

 

पन्नास टक्के वेतनवाढ : अमित कोरे यांची माहिती

अंकली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व रोजंदारी करमाऱ्या कर्मचाऱ्यांसह उद्योजक व्यावहारिक व मध्यमवर्गीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी ग्रामीण भागात सहकारी संस्थानच्या माध्यमातून देण्यात येणारे आर्थिक साहाय्य त्यामुळेच त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारले असून त्याचबरोबरच सहकारी संस्थेच्या विकासासाठी गेल्या 34 वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करत असलेल्या व डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अंकली येथील डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या सभासदांना यावर्षी प्रतिशत पंधरा टक्के लाभांश देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात वीस टक्के बोनस व कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के वेतन वाढ करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळाचे संचालक व डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे आमंत्रित संचालक अमित कोरे यांनी अंकली येथे संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
राज्यसभेचे माजी सदस्य के एल ई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 34 वर्षांपासून कार्यरत असलेल्या अंकली येथील डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षांत 14 कोटी 73 लाख रुपये निव्वळ लाभ झाला असून सभासदांना प्रतिशत पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. संस्थेने जाहीर करण्यात आलेल्या सभासदांची बोनस रक्कम त्या त्या शाखेच्या सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. त्यासाठी सभासदांनी आपापल्या शाखेशी संपर्क साधून बोनस स्वीकारावा असे त्यांनी सांगितले.

सध्या सहकारी संस्थेच्या 47 शाखा कार्यरत असून 300 पेक्षा अधिक जास्त कर्मचारी काम करत आहेत. चालू वर्षांत 31 कर्मचाऱ्यांना कायम नेमणूकीचे आदेश पत्र देण्यात आले आहे. सध्या आर्थिक क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली असून ज्या शाखेत कर्मचारी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करून संस्थेला अधिक नफा मिळवून देण्यास व प्रामाणिक कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच शाखेच्या अन्य 21 शाखा प्रारंभ करण्यात येणार असून लवकरच सदर संस्था बहुराज्य कायद्याखाली नोंदणी करून महाराष्ट्र व गोवा राज्यात शाखांना प्रारंभ करण्यात येणार असल्याचेही अमित कोरे यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे प्रधान व्यवस्थापक देवेंद्र करोशी बोलताना म्हणाले की, 31 मार्चअखेर संस्थेकडे 56521 सभासदांची संख्या असून सभासद भागभांडवल 2.67 कोटी रुपये शेअर भांडवल आहे. संस्थेने आज अखेर 1214 कोटी रुपये ठेवी संग्रहित करून इतर निधी 50.23 कोटी रुपये आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या हितासाठी 820 कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या संस्थेच्या हितासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ राहून सर्वसामान्य सदस्यांनी आपला आर्थिक विकास करून घ्यावा असेही अमित कोरे यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष महांतेश पाटील, उपाध्यक्ष सिद्धगौडा मगदूम, संचालक डॉ. प्रीती दोडवाड, मल्लिकार्जुन कोरे, अण्णासाहेब संकेश्वरी, पिंटो हिरेकुरबर, बसनगौडा आसंगी, डॉ. सुकुमार चौगुले, अमित जाधव, प्रफुल्ल शेट्टी, बाळाप्पा उमराणे, अशोक चौगुला, अनिल पाटील, श्रीकांत उमराणे, सौ. शोभा जकाते, शैलजा पाटील, पार्वती धरनाईक, जयश्री मेदार उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत व आभार सौ. सुनंदा मगदूम यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात स्वा. सावरकर यांच्यावर डॉ. अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान संपन्न

Spread the love  सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *