सिंगापूरमधील स्पर्धेत सुवर्णपदक
सदलगा : दहावीत शिकणाऱ्या नील पंकज कुलकर्णी वय वर्षे पंधरा, सरस्वती सेकंडरी स्कूल, सरस्वती क्रिडा संकुल ठाणे येथे गेली सहा वर्षे तायक्वांडोचे प्रशिक्षण घेत आहे. एका पौर्वात्य तायक्वांडो सारख्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले आणि सिंगापूरमधील स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून सुवर्ण पदक पटकावले. एका खडतर व्यायाम असलेल्या खेळात आपले शरीर काटक, प्रमाणबद्ध ठेवून विशेष प्राविण्य मिळविले.
स्टारवन तायक्वांडो अकादमी ठाणेच्या ठाणे जिल्हा चँपियनशिपमध्ये दोनदा सुवर्णपदक मिळविले, आंतरराज्य स्पर्धेत औरंगाबादमध्ये सहभाग, SFA मध्ये दोनदा कांस्यपदक, एकदा रौप्य पदक, मुंबई गेम्स मध्ये दोनदा रौप्य पदके मिळविली.
२०२२ च्या मे महिन्यात हैदराबादच्या स्पर्धेतील तायक्वांडोच्या चारही प्रकारात नीलने सुवर्णपदक पटकावले. यामुळेच लाईट स्पोर्ट्स अकॅडमीकडून आयोजित केलेल्या सिंगापूरमधील ओपन इंटरनॅशनल तायक्वांडो चँपियनशिपमध्ये सहभागी झाला आणि सुवर्ण पदक पटकावले. अशिया खंडातील तायक्वांडो साठी प्रसिद्ध असलेल्या जे. एच्. किम् स्कूलमध्ये सतरा दिवसांचे प्रशिक्षण घेण्याची संधीही त्याला मिळाली. त्याला मुख्य प्रशिक्षक दीपक मालुसरे, सहाय्यक प्रशिक्षक समृद्ध बेल़ोसे आणि टीम व्यवस्थापक विनिता खोत यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व प्रतिस्पर्ध्यांसमोर एका बुक्कीत फरशीचे तुकडे तुकडे करायचे हा या खेळातील एक असामान्य प्रकार असावा पण त्याने लीलया करुन दाखवला.
एखाद्या पौर्वात्य क्रिडा प्रकारात प्राविण्य मिळवून सदलग्याचा झेंडा परदेशात फडकवणारा नील पहिलाच.