चिक्कोडी : कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील बेळकोड गेटजवळ बुधवारी घडली.
शिवकुमार राजू घोष (२५) आणि त्याचा भाऊ अश्विनकुमार राजू घोष (२३, रा. चिक्कोडी तालुक्यातील नवलीहाळ) अशी मृतांची नावे आहेत.
चिक्कोडी तालुक्यातील नवलीहाळ गावातून गोकाक तालुक्यातील शिंधीकुरबेट्टकडे दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते, असे सांगण्यात येत आहे. कार कब्बूर शहरातून चिक्कोडीच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाने आपली कार मागे घेण्यासाठी गेला असता, तो चुकीच्या दिशेने गेला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकला.
याप्रकरणी चिक्कोडी पोलिस स्थानका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta