चिक्कोडी : निप्पाणी-चिक्कोडी रस्त्यावर कोथळी क्रॉसजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला.
गोकाक तालुक्यातील मल्लापूर पीजी गावातील बसवराज श्रीमंत नंदगावी (वय ४८) आणि दोडव्वा बसवराज नंदगावी (वय ४२) अशी मृतांची नावे आहेत. कारमधील चार जण जखमी झाले. बसवराज हा दुचाकीस्वार पत्नी दोड्डव्वा सोबत कोथळी गावात नातेवाईकाच्या घरी जात होता. त्यांची दुचाकी कोथळी क्रॉसजवळ आली असता कार चालक ज्ञानेश्वर देशमुख हे चिक्कोडीमार्गे उस्मानाबादकडे जात असताना कारचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीवर असलेले पती-पत्नी खाली पडले. बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोडव्वा, कार चालक ज्ञानेश्वर यांची पत्नी अमृता आणि मुलगा राजवीर जखमी झाले.जखमींना तातडीने चिक्कोडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार अपयशी ठरल्याने दोडव्वा यांचा मृत्यू झाला. उर्वरित चौघांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले.घटनास्थळी सीपीआय एस. सी. पाटील यांच्यासह उपनिरीक्षक सुमलता असंगी सहायक उपनिरीक्षक एन. एस. पुजारी यांनी भेट दिली. ही घटना खडकलाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta