
सदलगा : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकोडी-सदलगा मतदार संघातील सदलगा शहरात एकूण १४ बूथमधून सुमारे 57 टक्के मतदान झाले आहे. महिलांचा मतदानामध्ये लक्षणीय सहभाग जाणवत होता. ज्या बूथमध्ये महिला आणि युवा मतदार जास्ती मतदान करणारे आहेत अशा बूथना अनुक्रमे पिवळ्या आणि गुलाबी फुग्यांची कमान लावली होती. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंडप घातले होते. पोलिस बंदोबस्त चांगला ठेवला होता. मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात सुरू होते. मतदान सुरू झाल्यानंतर सुमारे दहाच्या दरम्यान विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी सदलगा येथील कुवेंपु शतमानोत्सव मॉडेल शाळा आणि सदलगा हायस्कूल येथील बूथना भेट दिली.
संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया ही अविश्रांत सुरुच राहणार आहे तसेच, या बूथमध्ये बूथ क्र १ ते ४ हे जनवाड गावाचे आहेत. ५ ते १८ हे सदलगा नगरपालिकेच्या क्षेत्रातील असून एकूण २०५०० मतदारांपकी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत २८.८०% मतदान झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta