
सदलगा : येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये शहराच्या उत्तरेकडील बस स्थानकाच्या बाजूने उतारावरुन गटारीतून येणारे सांडपाणी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तुंबुन राहते त्यामुळे तिथे तेलसंग यांच्या प्लॉट समोर दलदल निर्माण झाली आहे. घाणीने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो. याच परिसरात ज्योती बाजार, कर्नाटकाचा अभिमान, राणी चन्नम्माच्या पुतळ्याची नियोजित जागा आणि चौथरा, मुस्लिमांचे पवित्र प्रार्थनास्थळ, लक्ष्मी बँक, माजी नगराध्यक्षांचे राहते घर, विविध थंड/गरम पेयांची दुकाने, किराणा मालाची दुकाने, इतरही अनेक दुकाने, शेजारच्या शेतात नविन वसाहत बनविण्याचे काम जोमाने सुरू आहे. अशा गजबजलेल्या चौकातूनच आठवडी बाजार सुरू होतो, अशा ठिकाणी सांडपाण्यामुळे झालेली दलदल, डुकरांचा मुक्त वावर, दुर्गंधी यामुळे नाक धरुन या चौकातून पुढे जाण्याची प्रत्येकजण घाई करत असतात. आठवडी बाजाराच्या दिवशी तर हा चौक खूपच गजबजलेला असतो. या कारणाने छोटेमोठे अपघात होत असतात.
या गोष्टींकडे नगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष पुरवून इथली दलदल हटवली पाहिजे अशी मागणी जनसामान्यांच्यातून होत आहे.
तसेच, राणी चन्नम्मा सर्कलमध्ये नियोजित पुतळ्यांच्या कुंपणाबाहेर सतत कुणाच्या तरी चारचाकी गाड्या, ट्रक, मिनी टेंपो उभे करून वाहतुकीस अडचण निर्माण केली जात आहे याकडेही लोकांनी लक्ष वेधले आहे.
नगरपालिका प्रशासना या बाबतीत ढिम्मच का राहिले असा चर्चेचा सूर नागरिकांतून उमटत आहे. येणारा पावसाळा गृहित धरून राणी चन्नम्मा सर्कलमधील लवकरात लवकर ही दलदल हटवून दुर्गंधीमुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta