चिक्कोडी : कब्बूर ते बागेवाडी दरम्यान असलेल्या कालव्यानजीक एकाचा खून करुन मृतदेह टाकण्यात आलेला प्रकार उघडकीस आला आहे. कब्बूर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या शिरहट्टीकोडी येथील रहिवासी भीमाण्णा कल्लाप्पा मुन्नोळी (वय 51) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री खून करुन मृतदेह कब्बूर ते बेल्लद बागेवाडी रस्त्यालगत असलेल्या कालव्या शेजारी टाकण्यात आला आहे. डोक्यात दगड घालुन खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला.
भीमाण्णा याला चार बंधू असून त्यांचे निधन झाले आहे. तो अविवाहित होता. दारुच्या व्यसनापोटी त्याने आपली जमीन दुसऱ्यांकडे गहानवट ठेवली होती. त्याच्या मृत्त्यूचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक बसवराज यलिगार, मंडल पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली व सहकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. चिकोडी पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta