कागवाड : मंगसुळी येथे कर्नाटक विकास ग्रामीण बँक ही एकमेव बँक असून येथील सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये चालतात. सदर बँकही अपुल्या जागेत असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला अडचण होत आहे.
यासाठी प्रत्येक विभागाचे वेगवेगळे काऊंटर करून कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. तसेच वरचेवर सर्व्हरची समस्या निर्माण होत असल्याने व्यवहार ठप्प होत आहेत. रक्कम ठेवण्यास किंवा भरण्यास पूर्ण दिवस लागत आहे. त्याचबरोबर बँकेत गर्दी होत असून पाऊल ठेवण्यास सुद्धा जागा राहत नाही. त्यामुळे आणखी एक राष्ट्रीयीकृत बँक सुरू करावी, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta