चिक्कोडी : बहिणीच्या नवऱ्याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मेहुण्याने दाजीचा गळा आवळून खून केल्याची घटना चिक्कोडी शहरातील विद्यानगरमध्ये घडली.
जैनापूर गावातील माजी सैनिक आणि क्रशर मालक इरगौडा शिवपुत्र टोपगोळ (४५) याचा मृत्यू झाला आहे.
चिक्कोडी शहरातील विद्यानगर येथील राहत्या घरी त्याची हत्या करण्यात आली. मेहुणा संजय भाकरे याच्यावर दाजीच्या हत्येचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीच्या पतीचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संजयने हत्या केली.
मूळचे जैनापूर गावचे माजी सैनिक इरगौडा यांनी चिक्कोडी येथे घर बांधले आणि ते पत्नी आणि मुलांसह राहत होते.
चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सीपीआय विश्वनाथ चौगला आणि पीएसआय बसनगौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta