
बेळगाव : देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जात असताना कारची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात भाऊ-बहीण जागीच ठार झाले. मलिकवाड – नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळजवळ मंगळवारी हा अपघात झाला. प्रशांत तुळशीकट्टी (वय २०) आणि प्रियांका तुळशीकट्टी (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.
प्रशांत व त्याची बहीण प्रियांका हे दोघे दुचाकीने चिक्कोडीला परटी नागलिंगेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. त्यांची दुचाकी मलिकवाड- नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळजवळ आली असता मलिकवाड येथील निवृत्त सैनिक दादासाहेब कोळी त्यांच्या मुलासह नेक्सा बलेनो या कारमधून गोव्याकडे चिक्कोडी मार्गे मलिकवाडकडे येत होते. त्यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात भाऊ-बहीण जागीच ठार झाले. याबाबत समजताच कुटुंबीयांसह नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कारमधील एअरबॅगमुळे दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. सदलगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta