Tuesday , March 3 2026
Breaking News

डॉ. चारुदत्त कासार यांना पीएचडी प्रदान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : चिकोडी तालुका शिक्षण संस्थेच्या श्रीमती ए. ए. पाटील महिला महाविद्यालयातील मराठीचे प्रा. डॉ. चारुदत्त भालचंद्र कासार यांना धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. धारवाड येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलाधिपती व राज्यपाल डॉ. थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते पदवी प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.
डॉ. कासार यांनी डॉ. ए. आर. यारदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कुसुमाग्रजांच्या साहित्यातील देशभक्ती विषयक जाणीवांचा अभ्यास’ हा प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. डॉ. कासार यांना संस्थेचे अध्यक्ष सी. बी. कुलकर्णी, उपाध्यक्ष व्ही. एस. मांजरेकर, सेक्रेटरी, संचालक व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

नैवेद्य दाखवताना कृष्णा नदीत बुडून महिलेचा मृत्यू

Spread the love  चिक्कोडी तालुक्याच्या मांजरी गावातील घटना चिक्कोडी : नैवेद्य दाखवत असताना पाय घसरल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *