लक्ष्मण चिंगळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती सुरू आहे. त्यामध्ये आणखीन भर पडावी. यासाठी बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत चिक्कोडीत डॉ. बी. आर. आंबेडकर पदव्यत्तर केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उच्च शिक्षणमंत्री के. सुधाकर, कर्नाटक राज्याचे आयटी मंत्री प्रियांक खर्गे व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, चिक्कोडीत डॉ. बी. आर. आंबेडकर पदव्युत्तर केंद्र झाल्यास या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू मुलांची सोय होणार आहे. बेळगाव ऐवजी चिक्कोडीस उच्च शिक्षणाची सोय झाल्यास परिसरातील विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवासाचा भुर्दंड वाचणार आहे. यावेळी डॉ. सुब्बाराव, सिद्धार्थ गायगोळ, बी. एस. नाडकर्णी, रावसाहेब फकीरे, महांतेश चालुवादी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta