मतमोजणी सुरळीत, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडा: जिल्हाधिकारी नितेश पाटील
चिक्कोडी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भात चिक्कोडी आर. डी. हायस्कूलच्या मतमोजणी केंद्राला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
चिक्कोडी लोकसभा मतदान केंद्रातील विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूम्सना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व मतमोजणी कक्षांची त्यांनी पाहणी केली व मतमोजणी सुरळीत, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद , ग्रा.पं. उपसचिव बसवराज अडवीमठ, चिक्कोडी उपविभागीय अधिकारी मेहबूबी. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, सी.पी.आय. गोपालकृष्ण गौडा, ई.ओ. जगदीश कम्मार, पोलीस व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.