चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा ग्रा.पं. सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी (१ मे) पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक-2024 संदर्भात चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाची सोय व्हावी यासाठी चिक्कोडी तहसीलदार कार्यालयातील कोर्ट हॉलमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.
1 ते 3 मे या कालावधीत अत्यावश्यक सेवेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत चिक्कोडी तहसीलदार कार्यालयाच्या कोर्ट हॉलमध्ये उभारलेल्या मतदान केंद्रावर हजर राहून मतदान करावे, असे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुला शिंदे यांनी सांगितले.
याच प्रसंगी चिक्कोडी उपविभागीय अधिकारी कु.मेहबूबी यांच्यासह प्रशिक्षणासाठी आलेले मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टल मतदानाद्वारे आपला हक्क बजावला. चिक्कोडी तहसीलदार चिदंबरा कुलकर्णी उपस्थित होत्या.