Monday , December 8 2025
Breaking News

सदलगा शहरातील हजरत ख्वाजा शमनामीर दर्गा येथे मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा या शहरी सेवासदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिक्कोडी, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम युवा समाज सेवा संघ सदलगा आणि हजरत ख्वाजा शमनामीर दर्गा कमिटी सदलगा यांच्या संयुक्त आश्रयाखाली मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आज शिबिराचे मुख्य डॉक्टर श्री अब्रार अहमद पटेल, चिक्कोडी सदलगा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. दादासाहेब पाटील, शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री. अण्णासाहेब कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रारंभी सर्व उपस्थित डॉक्टरांचे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे डॉ. ए‌ पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री. अझरुद्दीन शेखजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर रुग्ण तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली.
या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी, हृदयरोग यांसाठी मोफत इ सी जी तपासणी, इत्यादी तपासणी या शिबिरात घेण्यात आल्या. हे शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत घेण्यात आले. या शिबिरासाठी सेवासदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडीचे डॉ. अब्रारअहमद पटेल (एम डी मेडिसिन), डॉक्टर श्रुती सरवदे (एम डी), फयीम कमते नेत्र तपासणी तज्ञ, कुमारी गौरी पाटील, पीआरओ बसवराज अमीन भावी, मार्केटिंग हेड पंकज सनक्की, कुमारी कवना शाहीर, प्रेमानंद बेळे यांच्यासह सदलगा शहरातील मान्यवर माजी नगराध्यक्ष अभिजीत पाटील, नगरसेवक रवी गोसावी, नगरसेवक आताऊल्ला मुजावर, आझाद मुजावर, संतोष नवले, सुनील पाटील, सिकंदर डांगे, हरीश हितलमनी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात नेत्र तपासणी व इतर आरोग्य तपासणीचे अंदाजे दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार देऊन आणि पुढील उपचारासाठी सल्ला देखील देण्यात आलेला आहे. शिबिरा ठिकाणी मोठ्या संख्येने स्त्री व पुरुष रुग्णांची उपस्थिती होती. या स्तुत्य उपक्रमाचे सदलगा शहरवासीयांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात स्वा. सावरकर यांच्यावर डॉ. अमर अडके, डॉ. ज्योती चिंचणीकर यांचे व्याख्यान संपन्न

Spread the love  सदलगा : येथील अतुल जोशी यांच्या हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *