चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. ज्योती व राहुल शिरटी यांचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांनी भावी जीवनाची अनेक स्वप्ने पहिली होती. या घटनेने शिरटी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळीचे रहिवासी असलेले राहुल हे आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून (एमएच 09 सीक्यु 9064) बेळगावहून चिकोडीकडे जात होते. यावेळी चिकोडीच्या दिशेने जाणाऱ्या (केए 23 ए 4405) या डंपरचा आणि दुचाकीचा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण हाेती की, ज्योती शिरट्टी डंपरच्या मागील चाकात अडकून काही अंतरापर्यंत फरफटत गेल्या. त्या जागीच ठार झाल्या. पती राहुल गंभीर जखमी झाले. त्यांना चिकोडी येथील रूग्णालयात दाखल केले आहे. चिकोडी पीएसआय यमनाप्पा मांग घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
Check Also
सर्वसामान्यांनाही उज्ज्वला योजनेप्रमाणे सबसिडी द्या
Spread the love निपाणी : केंद्र शासनातर्फे उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना सबसिडीच्या दरात स्वयंपाक …