हापूर : उत्तर प्रदेशमधील हापूर येथील धौलाना येथील केमिकल कारखान्याला आज दुपारी आग लागली. या दुर्घटनेत ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. १५ हून अधिक जखमी झाले. जखमींना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुही फॅक्टरीमध्ये दुपारी तीनच्या दरम्यान भीषण स्फोट झाला. यानंतर कारखान्याला आग लागली. यामध्ये आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.
आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. या अपघातास जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पाेलिस सूत्रांनी दिली.
