Saturday , June 14 2025
Breaking News

हरगापूर येथील आदर्श वाचनालय..

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर ग्रामपंचायतने ग्रामस्थांना वाचनालयाची ओढ लावलेली दिसताहे. हरगापूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष पवन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हरगापुरात आदर्श वाचनालयाची निर्मिती झालेली दिसत आहे. हरगापूर सार्वजनिक वाचनालय व माहिती केंद्रात वाचकांसाठी हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी एक हजार पुस्तके उपलब्ध करून दिलेली दिसताहेत. वाचनालयाची रचना सुंदर असून येथे चार विभाग कार्यरत आहेत. वाचनालयात मुली आणि महिलांसाठी, अपंगत्व असलेल्या लोकांसाठी, सार्वजनिक आणि विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररीची सोय करण्यात आली आहे. शालेय महाविद्यालयीन मुले-मुली संगणक लायब्ररीचा उपयोग घेतांना दिसताहेत. वाचनालयात प्रिंटर आणि स्कॅनरची सोय असल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती संग्रहीत करता येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे येथे माफक दरात प्रिंट मिळण्याची सोय देखील करण्यात आली आहे. वाचनालयाविषयी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना हरगापूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य पवन पाटील म्हणाले आमचे लाडके नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून हरगापुरात आदर्श वाचनालयाची निर्मिती करता आली आहे. तालुका पंचायतच्या १४ फायनान्स मधून अडीच लाख रुपये मिळवून वाचनालयाची इमारत उभी केली असून राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी वाचनालयासाठी एक हजार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. वाचनालयात ग्रामस्थांना दैनिकांसोबत, मासिके, महत्वाची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुली आणि महिलांसाठी वाचनालयात कक्ष असून विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररीची सोय असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

“खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर स्वाधीनतेचे संकट कोसळले आहे. भांडुरा नाल्याचे पाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *